औरंगाबाद – शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी एसटी महामंडळाच्या 20 ते 25 कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून भिक मांगो अंदोलन केले म्हणून कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, 80 पेक्षा जास्त कर्मचारांचे बळी घेणाऱ्या आघाडी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय यासह अन्य घोषणा फलकांद्वारे कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
सहाय्यक फौजदार सुभाष रोडामन चव्हाण यांनी यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद कुलकर्णी, मच्छिंद्र बनकर, दिनेश गवळे, संतोष शिंदे, जी.टी.पवार, तनवीर खान, अरुण मोडे, जयश्री हजारे, सारीका डोंगरकर, शेट्टी मँडम, कल्पना मानवतकर, उदय कुलकर्णी इतर 12ते 15 कर्मचारी यांच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान काल प्रजासत्ताक दिनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्यद्वारवर 20 ते 25 एस.टी. कर्मचारी हातात फलक घेवून होते. फलकावर देदो बाबा देदो, राज्य सरकार के नाम पर भीक देदो, सरकारला भीक लागलेली आहे. त्यामुळे ते एस.टी. कामगारांच्या मागण्या मान्य करु शकत नाही,आता जनतेने मदत करावी. राज्य शासनात एस.टी.कामगारांचे विलगीकरण झालेच पाहीजे, 80 पेक्षा जास्त कर्मचारांचे बळी घेणारे हेच का ते प्रगतशिल महाराष्ट्र सरकार, सरकार तुपाशी एस.टी.कामगार उपाशी वा रे सरकार आदी फलक हातात घेवून महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, आघाडी सरकारचा धिक्कार असो, आघाडी सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा सरकार विरोधी घोषना देत होते.