माय- लेकीच्या नात्याला काळिमा!! मुलीला देहविक्रीस भाग पाडणाऱ्या सावत्र आईसह एकावर गुन्हा दाखल

satara police station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आई व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात समोर आले आहे. एका सावत्र आईने अल्पवयीन मुलीला साडेतीन हजारासाठी देह विक्रीसाठी भाग पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेसह एकावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सदर अल्पवयीन मुलीने याबाबत एफआयआर दाखल केला असून तिच्या सावत्र आईने तिला देहविक्रीस भाग पाडून त्याचे पैसे स्वतःकडे घेतले असा आरोप करण्यात आला आहे. यंत्र पीडित मुलीची सावत्र आई व अत्याचार करणाऱ्या चाळीस वर्षीय व्यक्ती विरोधात मुलीची विक्री करणे व जबरदस्तीने अत्याचार करण्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे अशी माहिती सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे

या संपूर्ण प्रकरणाबाबत ठोस पुरावे आम्ही गोळा करत असून लवकरात लवकर आम्ही ते न्यायालयासमोर सादर करू. तसेच याप्रकरणी लॉज चालकाला कितपत माहिती आहे, तो रूम कोणाच्या नावावर बुक केली होती याचा तपास सुरु आहे. यामध्ये जर लॉज चालकाची चूक आढळून आली तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी माहितीही समीर शेख यांनी दिली.