हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीनचे टिकटॉक हे ऍप भारतात बंद झाल्यानंतर आता अमेरिकेतही या ऍपवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. आता भारतीय वंशाचे एका दिग्गज टेकचे सीईओ यांनी टिकटॉक खरेदी करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. मायक्रोसॉफ्ट टिकटॉकच्या अमेरिकी ऑपरेशंसना खरेदी करू शकते. भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्ट चे सीईओ सत्या नडेला यांनी यासंदर्भात चर्चा सुरु केली आहे. आणि ही चर्चा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. सत्या नडेला यांनी हैदराबाद पब्लिक स्कूल येथून शिक्षण घेतले आहे.
सत्या नडेला यांच्याशिवाय ऍडोब चे सीईओ शांतनु नारायण, मास्टरकार्ड चे सीईओ अजयपाल सिंह बंगा आणि अरबपति इन्व्हेस्टर प्रेम वत्स देखील हैदराबाद पब्लिक स्कूल मधून शिकले आहेत. याशिवाय येथून राजकारण, अभिनय, पोलीस आणि प्रशासकीय सेवेत अनेक लोक रुजू झाले आहेत. सुप्रीम कोर्टच्या वरिष्ठ अधिवक्ता मेनका गुरुस्वामी ज्या न्यूयॉर्क च्या कोलंबिया लॉ स्कूल मध्ये बीआर अंबेडकर रिसर्च स्कॉलर आणि लेक्चरर आहेत त्याही इथेच शिकल्या आहेत. यासोबत आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री वाईएस जगनमोहन रेड्डी देखील एचपीएस मधून शिकले आहेत.
मनोरंजन क्षेत्रालाही हैदराबाद पब्लिक स्कूल ने अनेक दिग्गज दिले आहेत. नागार्जुन और राणा दुग्गाबती ही त्यातीलच काही नवे आहेत. एचपीएस चे प्राचार्य डॉ. स्कंद बाली यांनी या दिग्गजांव्यतिरिक्त इंडियन क्रिकेट कॉमेंटेटर आणि पत्रकार हर्षा भोगले देखील या शाळेतून शिकल्या असल्याचे म्हंटले आहे. तर सध्या मायक्रोसॉफ्ट चे सीईओ असणारे एचपीएस चे विद्यार्थी सत्या नडेला लवकरच टिकटॉक खरेदीबाबत अधिकृत बोलतील असे बोलले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.