सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
रायगड किल्यास स्वराज्यात आणण्याच्या मोहिमेत कोरेगावचे समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. या घटनेला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याच्याप्रित्यर्थ कोरेगाव येथील बर्गे मंडळींच्यावतीने नुकतेच रायगडावर खंडेराव बर्गे पराक्रम, शौर्य, अभिमान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी किल्ले रायगड स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली.
यावेळी कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, ज्येष्ठ विधीज्ञ चंद्रशेखर बर्गे, इतिहास संशोधक पांडुरंग सुतार, ज्येष्ठ नागरिक फत्तेसिंह बर्गे, कोरेगाव ग्राम सेवा सोसायटीचे अध्यक्ष नारायणराव बर्गे, बाळासाहेब बर्गे, युवक कार्यकर्ते संग्राम बर्गे आदींसह नागरिक, युवक रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाले.
गडावर गेल्याबरोबर प्रथमतः राजदरबारातील मेघडंबरीतील सिंहासनाधिष्टित श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सर्व मान्यवरांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर किल्ले रायगडावर राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यात प्लॅस्टिक कचरा, मिनरल वॉटर बाटल्या आदी कचरा जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी पुष्पा चंद्रशेखर बर्गे, लालसिंग शिंदे, पांडुरंग बर्गे, शिवलिंग बर्गे, संजय वि. बर्गे, सोमनाथ बर्गे, शाहूराजे बर्गे, रणजित बर्गे, अभिजित सु. बर्गे, अभिजित व. बर्गे, निशांत माने, नवनाथ पवार, अक्षय जाधव, निलेश पवार, अनिल खटावकर, निलेश राऊत, दिनकर कोंढाळकर आदी उपस्थित होते.