सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या नारळाच्या ट्रकने वेण्णा नदीवरील पुलाच्या कठड्यास जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकचा पुढील बाजूचा भाग नदीपात्रात कोसळला तर ट्रकमधील चालक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कर्नाटकहून नारळाने भरलेला ट्र्क क्रमांक (TN 88 W 6373) हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. ट्रकचालक ट्र्क घेऊन पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघाला असताना तो वाढे फाट्यानजीक आला. यावेळी ट्रकमधील चालकाचा पहाटेच्या सुमारास डोळा लागल्याने ट्र्क वेण्णा नदीवरील कठड्यास धडकला. यावेळी ट्रकचा पुढचा भाग हा पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. यामध्ये ट्रकमधील चालकाचं गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Satara News : वेण्णा नदीत नारळाचा ट्रकचा कोसळला; ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक pic.twitter.com/5CKwQraKB2
— santosh gurav (@santosh29590931) May 3, 2023
तर्क कठड्यास धडकताच ट्रकमधील नारळाची पोती पुलावरून खाली विखुरली गेली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकमधील चालका तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ट्र्कमधील चालकावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.