औरंगाबाद । कोरोनामुक्तीच्या लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्यात गोंधळानंतर चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी औरंगाबाद मधील बजाजनगर येथील मोहोटा देवी मंदिराजवळील आरोग्य केंद्रात घडला. घटना घडल्यानंतर केंद्राबाहेर काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
याबाबत अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद येथील बजाजनगर येथील लसीकरण केंद्रावर सोमवारी शहरातील नागरिक लसीकरण करण्यासाठी आले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी केली होती. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना टोकन वाटले जात होते. तर महिला आणि पुरुष अशा दोन रांगा करण्यात आल्या होत्या. दरम्यान, टोकन वाटप बंद झाल्याने कर्मचारी यांनी गेट बंद केला. कर्मचाऱ्यांच्या या प्रकारामुळे त्या ठिकाणी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्या गोंधळाचे रूपांतर चेंगराचेंगरीत
अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे त्या ठिकाणी काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कुणीही गंभीर जखमी झाला नसून किरकोळ दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चेंगराचेंगरी चे वातावरण शांत केले.