राऊतांनी फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी; दरेकरांचा खोचक सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेऊ नये अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावल्या नंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला.

दरेकर म्हणाले, मला वाटत संजय राऊत यांनी शिवसेनेची चिंता करावी जेणेकरून शिवसैनिक त्यांना धन्यवाद देतील. कारण ते राष्ट्रवादीची चिंता करत आहेत. राष्ट्रवादीची चिंता केल्यामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे असा दावाही त्यांनी केला आहे

संजय राऊत नेमकं काय म्हणाले –

राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. फडणवीस त्यापैकी एक आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी संन्यास घेतला तर भारतीय जनता पार्टीचं तसंच जनतेचंही मोठं नुकसान होईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.