गौतमी पाटीलच्या विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात सध्या लावणी फेम म्हटलं की गौतमी पाटील हीच नाव घेतलं जात आहे. अर्थात सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात हॉट लावणी करणारी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत आली आहे. मात्र, आता गौतमी पाटील हिच्याविरोधात सातारा येथील प्रतिमा शेलार यांनी सातारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लावणी सादर करत असताना गौतमीकडून अश्लील हावभाव केला जात असून तिच्या कार्यक्रमांवर बंदीची मागणी केली जात आहे. त्यामुळे सातारा येथील प्रतिमा शेलार यांनी गौतमी तिच्या नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करत सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाकडूनही गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

https://www.instagram.com/reel/Cmbv2TortSB/?utm_source=ig_web_copy_link

गौतमीचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर तिच्या कार्यक्रमांवर बंदीचीही मागणी केली गेली. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मंडळींसह लावणी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी गौतमीवर टीका केली होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती. मात्र, आता सातारा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.