सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल झाली आई; घरी जन्मले पुत्ररत्न

0
123
Shreya Ghoshal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतात आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी श्रेया घोषाल आता आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हि गोड बातमी खुद्द श्रेया घोषालने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम सोशल मीडियावर शेअर केली आहे. आज तिच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. ही बातमी तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. तिच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. चाहत्यांसह इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CPLCt-Ngx_M/?utm_source=ig_web_copy_link

गायिका श्रेया घोषालने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, आज दुपारी देवाच्या कृपेने आमच्या घरी पुत्र रत्न जन्मले आहे. ही अतिशय भावनिक अशी भावना आहे जी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. शैलादित्य आणि आमचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. तुम्ही दिलेले प्रेम आणि आशीर्वादासाठी तुमचे खूप आभारी आहे. काही महिन्यांपूर्वी श्रेयाने सोशल मीडियावर आई होणार असल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले होते. त्यावेेळी तिने बेबी शॉवरचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करून तिने लिहिले होते, ‘बेबी श्रेयादित्य येणार आहे! शिलादित्य मुखोपाध्याय आणि मला ही बातमी तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे. आपल्या प्रेम आणि आशीर्वादांची आवश्यकता आहे, कारण आम्ही आमच्या जीवनात या नवीन अध्यायासाठी स्वतःला तयार केले आहे. ‘

https://www.instagram.com/p/CL-57Vzg91h/?utm_source=ig_web_copy_link

दिनांक ५ फेब्रुवारी २०१५ रोजी बॉलिवूड जगतातील सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने तिच्या बालपणीचा मित्र शिलादित्यसोबत लग्न केले. श्रेया आणि शिलादित्य अगदी लहानपणापासूनचे घट्ट मित्र आहेत. शिलादित्य Hipcask.com वेबसाइटचे संस्थापक आहेत.

https://www.instagram.com/p/CLRhCy6Bjsx/?utm_source=ig_web_copy_link

श्रेयाने २००२ साली संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटातून आपल्या पार्श्वगायनाच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने ‘सिलसिला ये चाहत का’, ‘बॅरी पिया’, ‘छलक छलक’, ‘मोरे पिया’ आणि ‘डोला रे डोला’ अशी पाच गाणी गायली. यानंतर, तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली अनोखी ओळख निर्माण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here