सातारा | कोरेगाव तालुक्यातील एका गावात दि. 31/12/2019 रोजीचे रात्री 11.00 वा ते दिनांक 08/11/2021 रोजीचे रात्री 11.30 वा चे दरम्यान एकाने पिडीत महिलेच्या घरात शिरून वारंवार जबरदस्ती शारिरीक संबंध केले. तसेच घडलेला प्रकार तुझ्या मुलास किंवा इतर कोणास सांगितला तर तुला जीवे मारीन अशी धमकी दिल्याची तक्रार कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी मनोज वसंत कदम (रा. चंचळी, ता. कोरेगाव जि. सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडीत महिलेच्या पती आजारपणामुळे सन 1997 मयत झाले आहेत. तेव्हा पासून मनोज वसंत कदम हा महिलेस शेतातील कामात मदत करतो. दिनांक 31/12/2019 रोजी पिडीतेचा मुलगा रानात झोपण्यासाठी गेला होता. तेव्हा रात्री 11. 00 वाजणेचे सुमारास पिडीत महिलेच्या घरात मनोज शिरला. तेव्हा महिलेने एवढ्या रात्री आमचे घरी का आला आहे असे विचारले त्यावर त्याने माझा हात धरून पिरघळला व पिडितेस जवळ ओढुन जबरदस्ती शारिरीक संबंध केले. तसेच घडलेला प्रकार तुझ्या मुलास किंवा इतर कोणास सांगितला तर तुला जीवे मारीन अशी धमकी देवून तेथुन निघून गेला. त्यानंतर मी घाबरले असल्यामुळे महिलेने सदरचा प्रकार मुलाला सांगितले नाही. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी मनोज हा परत घरी आला व त्याने जबरदस्ती शारिरीक संबंध केले. परंतु भीतीपोटी कोणास काहीएक सांगितले नाही. त्यानंतर मनोज वसंत कदम हा वारंवार महिलेच्या घरी येवून शारिरीक संबंध करू लागला, तेव्हा त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने महिलेस मारहाण करून, सदरचा प्रकार कोणास सांगितला तर जीवे मारीन अशी धमकी दिली.
त्यानंतर महिला दिनांक 13/08/2021 रोजी मुलीला हीला भेटणेसाठी गेले होते. त्यावेळी सदरचा प्रकार मुलीस सागितला होता. त्यावेळी देखील महिलेने व मुलीने सदरचा प्रकार कोणासही सांगितला नाही. त्यानंतर दिनांक 15/10/2021 रोजी गावी चंचळी (ता. कोरेगाव) येथे परत आले थोडे दिवस व्यवस्थित गेलेनंतर दिनांक 08/11/2021 रोजी रात्री 11.30 वा चे सुमारास मनोज वसंत कदम हा पिडीतेच्या घरात शिरला व त्याने मला तु सदरचा प्रकार तुझ्या मुलीला का सांगितला असे म्हणुन मला मारहाण करुन जबरदस्ती शारिरीक संबंध केले. यापुढे तु तुझ्या जमिनीत यायचे नाही ती आता माझी आहे, आलीस तर तुला व तुझ्या मुलास जीवंत ठेवणार नाही अशी धमकी देवून महिलेस शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.