‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’; फडणवीसांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. “महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.

शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच देत आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

Leave a Comment