हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अनेक तरुण शेतीसोबत जोडधंदा करू लागले आहेत. 8 ते 10 तास नोकरी करून पैसे कमण्यापेक्षा आधुनिक शेतीचे तंत्र प्राप्त करून बक्कळ पैसेही कमवू लागले आहेत. अशीच कामगिरी गुजरातमधून नोकरी सोडून आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर सहाणे याने शेती करून दाखवली आहे. गुजरातमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेत झेंडूच्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न काढले आहे.
तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात फुलांची तसेच फळांची लागवड करायची असेल आणि रोपे विकत घेताना किंवा त्याबाबतच्या माहितीबाबत अडचण येत असेल तर चिंता करू नका. Hello Krushi हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा आणि तुमच्या आसपासच्या रोपवाटिका मालकाशी थेट संपर्क साधा. या माध्यमातून तुम्हाला हवी ती रोपे तुम्ही अगदी कमी खर्चात आणि महत्त्वाचे म्हणजे कमी वेळेत मिळवू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या खत दुकानदार, रोपवाटिका आणि कृषी केंद्रे यांची यादी दिसेल. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी ते शेतकरी, शेतकरी ते छोटा व्यापारी यांना एकमेकांशी जोडणाऱ्या Hello Krushi च्या माध्यमातून तुम्ही स्वतः पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता सुद्धा येतो. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.
Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here
गुजरातची नोकरी सोडून पत्करला शेतीचा मार्ग
संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील सहाणे कुटूंब हे मुळचे शेतकरी. बाळकृष्ण सहाणे यांना चार एकर शेती होती. मोठा मुलगा ज्ञानेश्वर यांनी घरच्या परिस्थितीमुळे गुजरातमध्ये पेपर मीलमध्ये नोकरी सुरू केली. मात्र, परवडत नसल्याने 2006 मध्ये नोकरी सोडून शेतीत परतण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी ज्योती, बंधू निवृत्त आणि भावजय निशिगंधा यांची साथ मिळाली. चार एकरात त्यांनी आधुनिक शेतीचे प्रयोग सुरू केले.
10 टन उत्पन्न, 80 रुपये दर
चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरची शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या ज्ञानेश्वर यांनी तीन एकरात झेंडू फुलांची शेती सुरु केली त्यातून सुमारे 10 टन झेंडूचे उत्पादन त्यांनी घेतले. तर त्यांच्या झेंडूला 80 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला. एकूण सहा लाखांचे उत्पन्न त्यांना झेंडूच्या शेतीतून मिळाले आहे. यापुढेही 10 ते 12 टन फुलांचे उत्पादन मिळेल व बाजारभाव टिकून राहिला तर चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा सहाणे बंधूंनी व्यक्त केली.
37 दिवसांत अशा प्रकारे घेतली झेंडूची काळजी
ज्ञानेश्वर यांनी सुरुवातीला झेंडू शेतीबाबत माहिती घेतली. माहितीनंतर त्यांनी मल्चिंग पेपरवल अप्सरा यलो या झेंडूच्या रोपांची लागवड केली. झेंडूच्या रोपांची वाढ चांगली व्हावी, फुले आकर्षक तसेच मोठी व्हावी यासाठी फिश ऑईल व जीवामृतचा वापर केला. त्यामुळे उत्पादन वाढण्यासही मदत झाली. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अल्पशा प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली. दरम्यान, 37 दिवसात फुले काढणीस आली. झेंडू फुलाच्या पहिल्या तोडणीत 600 किलो फुले मिळाली. त्यास प्रतिकिलो 50 रूपयांचा दर मिळाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात फुले निघू लागली व दरही चांगला मिळाला.
झेंडू हे फुल बारा महिने वापरत येणारे
झेंडू फुलांचा वापर हा बाराही महिने केला जातो. मार्केटमध्ये या फुलांना चांगली मागणी असते. झेंडू हे फुल बारा महिने वापरत येणारे फुल असल्याने हे कोणत्याही पूजेसाठी, सजावटीसाठी वापरले जाते. त्यामुळे सहाणे बंधूंनी झेंडूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आणि आज त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना चंगले उत्पन्नही मिळत आहे.
झेंडू पिकासाठी जमीन कशी असावी?
झेंडू पिकाची शेती करायची असेल तर झेंडूची लागवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे. झेंडूची लागवड करण्यासाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 5 ते 7.5 असावा. हलकी ते मध्यम जमीन या पिकास पोषक आहे. भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होत असली तरी उत्पादन कमी मिळते. उष्ण आणि समशीतोष्ण हवामान असेल तर झेंडूची वर्षभर लागवड करता येते. थंड हवामानात हे पीक चांगले येते.
झेंडुच्या प्रमुख जाती कोणत्या?
1) आफ्रिकन झेंडू : या प्रकारातील झेंडूची रोपे 100 ते 150 सें. मी. उंच वाढतात. फुले टपोरी असून फुलांना केशरी आणि पिवळ्या रंगाच्या छटा असतात. या प्रकारातील फुले हारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. आफ्रिकन झेंडूमध्ये कॅकरजॅक, आफ्रिकन टॅाल डबल मिक्स्ड, यलो सुप्रिम, गियाना गोल्ड, पाई, आलास्का, पुसा बसंती गेंदा या प्रमुख जाती आहेत.
2) फ्रेंच झेंडू : या प्रकारातील रोपे ही बुटकी 30 ते 40 सें. मी. उंचीची आणि झुडूपासारखी वाढतात. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून रंगात मात्र विविधता असते. फ्रेंच झेंडूमध्ये स्प्रे बटर लेमन ड्रॅाप्स, फ्रेच डबल मिक्स्ड, अर्का बंगारा या प्रमुख जाती आहेत.
खते आणि पाणी व्यवस्थापन
आपल्याला झेंडू फुलांतुन भरपूर उत्पादन मिळवायचे असेल तर झेंडूला वरखते देणे आवश्यक आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. हेक्टरी 60 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश या प्रमाणात खते देऊन झाडाला मातीची भर द्यावी. पावसाळ्यात आवश्यकतेनूसार 15 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. या काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.
फुलांची काढणी व उत्पादन
झेंडूच्या लागवडीपासून साधारणपणे अडीच ते तीन महिन्यात फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. जून महिन्यात लावलेल्या झेंडूच्या फुलांची तोडणी ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात सुरु होते. पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून वेचणी करावी. हारांसाठी देठविरहीत फुले तसेच गुच्छ किंवा फुलदाणीसाठी फुले देठासह तोडावीत. तोडणी दुपारनंतर करावी. तोडलेली फुले सावलीत गारव्याला ठेवावीत. योग्य काळजी घेतल्यास हेक्टरी 7 ते 10 टनापर्यंत उत्पादन मिळते.