सह्याद्री देवराई प्रकल्पा लगतच्या डोंगराला लागला वनवा; अनेक वृक्ष आगीत खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरा लगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे गावच्या हद्दीत सह्याद्री देवराई प्रकल्पा लगत असणाऱ्या डोंगराला शुक्रवारी रात्री वनवा लागला. अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष जळून खाक झाले.

सध्या डोंगराळ भागात वृक्षांना आग लावण्याच्या घटना घडत असून सातारा शहरालगत शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांकडून आग लावल्याची घटना घडली. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशामक विभागातील अधिकाऱ्यांना माहितीही दिली. मात्र, ही आग काही परिसरात पसरल्याने आगीत मोठ्या प्रमाणात अनेक वृक्ष जळून खाक झाले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/492290206339712

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून सह्याद्री देवराई प्रकल्पातील डोंगराळ परिसरात अनेक वृक्ष लावण्यात आलेले आहेत. यातील काही वृक्षांना देखील याआगीची झळ बसली आहे. काही वनप्रेमी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना अथक परिश्रमानंतर संपूर्ण आग विजवण्यात यश आले आहे.