औरंगाबाद – दोन फेब्रुवारीला बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेचा तिच्या प्रियकरानेच खुन केला असल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यात खून झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोपीविरोधात रविवारी खुनाचा गुन्हा नोंदवला. तसेच आरोपीला बेड्या ठोकण्यात न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. कविता घनश्याम असे मृत महिलेचे नाव आहे. अजमत खान (29) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन फेब्रुवारीला मध्यरात्री इच्छामणी हॉटेल जवळील मोकळ्या मैदानात एक अनोळखी महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी या महिलेस घाटीत दाखल केले. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा 6 फेब्रुवारीला मृत्यू झाला. तोपर्यंत महिलेची ओळख पटली नाही. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा परिसरातील नागरिकांनी महिलेस ओळखले अजमत खान हा महिला सोबत राहत होता. त्याने कुणाच्या दिवशी महिलेला बेदम मारहाण केल्याचेही सांगितले. त्यावरून पोलिसांनी अजमत खान याचा शोध घेऊन ताब्यात घेत चौकशी केली.
पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर अजमत ने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी केल्याची कबुली दिली. त्यामुळे या प्रकरणात उपनिरीक्षक संदीप पवार यांनी फिर्यादी होत अजमत खान यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक ब्रम्हागिरी करत आहेत.