पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात निघाली ‘क्रिकेट वर्ल्डकप ट्रॉफी’ची भव्य मिरवणूक; Video Viral

Cricket World Cup Trophy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेट विश्वचषकाला (world cup) सुरुवात होत आहे. या विश्वचषकातील पहिले पाच सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे, तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने खेळले जात आहेत. यानिमित्ताने आज पुण्यात क्रिकेट विश्‍वचषक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे विश्वचषकाच्या ट्रॉफीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल पथकाच्या गजरात ही भव्य मिरवणूक काढली गेली. यावेळी ट्रॉफीला पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची गर्दी दिसून आली.

आज ठीक दुपारी बारा वाजता विश्वचषकाच्या ट्रॉफीची मिरवणूक (world cup trophy) काढण्यात आली. ही मिरवणूक सेनापती बापट रोड पासून ते कृषी महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये भारतीय खेळाडू, रणजी खेळाडू आणि एमसीएचे बाकी सदस्य, आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. ही भव्य मिरवणुक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी सहभागी झाली होती. यानंतर विश्वचषकाची ट्रॉफी देखील लोकांना फोटो काढण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली.

सध्या सोशल मिडीयावर आजच्या मिरवणूकीचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये क्रिकेट प्रेमींची गर्दी दिसून येत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशियनने देखील आपल्या इंस्टाग्राम पेजवरून आजच्या मिरवणुकीचे व्हिडिओज पोस्ट केले आहेत. या व्हिडिओमध्ये क्रिकेट प्रेमींचा उत्साह दिसून येत आहे.

https://www.instagram.com/reel/CxpdThxIqOJ/?igshid=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान, पुढच्या महिन्यापासूनच विश्वचषकाला सुरूवात होत आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर, फायनलचा सामना हा 19 नोव्हेंबर रोजी होईल. 15 नोव्हेंबरला पहिला उपांत्य सामना खेळला जाईल. पुढे 16 नोव्हेंबरला दुसरा उपांत्य सामना होईल. पहिले 5 सामने हे पुण्यातील गहुंजे येथील स्टेडिअवर होणार आहेत. विशेष म्हणजे, तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने खेळले जाणार आहेत. त्यामुळे या सामन्यांसाठी पुण्यातील क्रिकेट प्रेमींची उत्सुकता आणखीन वाढली आहे.