भंगारच्या दुकानाला भीषण आग; नागरिकांची तारांबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील नांदलापूर येथे भर वस्तीतील भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरातील लोकांची तारांबळ उडाली. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान नांदलापूर येथे भरवस्तीत असणाऱ्या भंगारच्या दुकानाला अचानक आग लागली. याबरोबरच भंगार मध्ये आलेला टॅंकरही पेटल्याने परिसरातील लोकांच्या मध्ये मोठी धास्ती पसरली. या घटनेनंतर
नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिल्याने कराड नगरपालिकेचा अग्निशामक बंब तात्काळ पोहोचला. अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला

भंगारच्या दुकानाशेजारीच गणेश फर्निचर दुकान असून यामध्ये तब्बल दहा लाख रुपयांचे साहित्य होते.. तसेच ही आग भर वस्तीत लागल्यामुळे परिसरातील घरांनाही धोका निर्माण झाला होता अग्निशामक दलाने तात्काळ आग आटोक्यात आणल्याने नागरिकांनि सुटकेचा निश्वास टाकला