पिंपरी-चिंचवडमधील गोदामाला भीषण आग; 2 तरुणांचा होरपळून मृत्यू

Pimpari chinchwad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड शहरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. याआधी दोन तरुणांचा होरपळून मृत्यू आहे. मध्यरात्री गोदामाला लागलेल्या या आगीमुळे गोदाम मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीची दाहकता बघून परिसरातील स्थानिकांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलावून घेतले होते. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणली.

समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरातील पोट माळ्याच्या एका गोदामाला ही भीषण आग लागली होती. या आगीमुळे परिसरात देखील गोंधळ उडाला. तसेच, दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या सर्व घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड मधील अनधिकृत पोट माळ्याच्या समोर आला आहे कारण, या भागामध्ये अनेक अनाधिकृत पोट माळे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच पालिकेने या पोटमाळ्यांचे सर्वेक्षण केले होते. परंतु हा सर्वे फोल ठरल्याचे उघडकीस आले.

या सर्व घडामोडी घडत असतानाच पिंपरी-चिंचवडमधील पोटमाळ्यातील गोदामाला आग लागल्याचे समोर आला. ही आग लागली त्यावेळी गोदामात दोन तरुण अडकले होते. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु आगीच्या धुरात घुसमटून दोन्ही तरुण तेथेच बेशुद्ध पडले. यानंतर ताबडतोब स्थानिकांनी अग्निशामक दलाला बोलावून घेतले. आणि या तरुणांना बाहेर काढण्यासाठी तसेच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र तोपर्यंत आत अडकलेल्या दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला होता. सध्या या दोन्ही तरुणांची नावे समोर आलेली नाही. तसेच या कशी लागली हे देखील समजलेले नाही.