संतापजनक ! भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. हि घटना पुण्यातल्या वाघोली इथल्या मॅजेस्टिक सोसायटीच्या लेबर कॅम्पमध्ये घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पहाटे हि घटना घडल्याने लेबर कॅम्पमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे अनु राजू मिर्झा असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती राजू पुनाराम मिर्झा याला अटक केली आहे. याप्रकरणी राजेश मिर्झा यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिर्झा कुटुंब मूळचे छत्तीसगढ इथलं आहे. आरोपी राजू मिर्झा, मृत अनू मिर्झा हे दोघं मोशी या ठिकाणी बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. त्यांना दोन मुलं आहेत. राजू हा दारू पिऊन अनुला सतत मारहाण करत होता. यामुळे त्यांच्यात सतत भांडण होत असे. दोन-तीन महिन्यांपू्र्वी अनू गावाला जाते असं म्हणत घर सोडून गेली. पण ती गावी न जाता राजूचा धाकटा भाऊ राजेश मिर्झा याच्याकडे वाघोली या ठिकाणी राहायला गेली.

याची माहिती राजूला मिळताच तो सोमवारी पहाटे वाघोली इथल्या लेबर कॅम्पमध्ये अनुला भेटायला आला. अनु पत्र्याच्या खोलीत झोपली होती. राजुने मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत अनुला घराबाहेर बोलावलं आणि तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. तु सारखी माझ्या भावासोबत बोलतेस, त्याच्यासोबतच राहतेस, असा संशय मनात घेऊन त्याने प्लास्टिकच्या पिशवीत आणलेल्या चाकूने पोटात सपासप वार करून अनुचा खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला आहे.