धक्कादायक ! त्रास देते म्हणून अल्पवयीन मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मावळ : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्याला सावत्र आई त्रास देते म्हणून एका अल्पवयीन मुलाने कोयत्याने वार करून आईची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे तळेगाव दाभाडेमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील श्रीहरी कॉलनीत राहणाऱ्या रेखा जाधव यांचा अल्पवयीन सावत्र मुलाने तिक्ष्ण कोयत्याने वार करून खून केला आहे. हि घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीहरी कॉलनी येथे घडली. या घटनेत मृत रेखा जाधव हिचे ऐकून पती अरविंद हा दुसरी बायको तसेच घटनेतील आरोपीच्या कुटुंबीयांना मारहाण करून त्रास देत असे. सावत्र आई तसेच वडील यांच्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून कायमचा काटा काढण्यासाठी अल्पवयीन मुलगा स्वतःजवळ कोयता बाळगत होता.

बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा मुलगा रेखा जाधव यांच्या घरी पोहोचला. तिच्यासोबत शाब्दिक वाद घालत या आरोपी मुलाने आपल्याजवळ असलेल्या कोयत्याने रेखा जाधव यांच्या डोक्यावर हल्ला चढवत सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी होऊन रेखा जाधव यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.