अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार

fe a f ac dfce
fe a f ac dfce
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी  | सुरज घुमे 

 घरी एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर परिसरातील अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी अष्टभूजा परिसरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, अल्पयीन मलाला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ जागेचा निकाल लागणार सर्वात आधी

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील पोंभूर्णा येथे मजुरीसाठी गेले होते. तर आई शहरात कामानिमित्त आली होती. पीडित मुलगी एकटीच घरी होती. हीच संधी साधून आरोपीने पीडितेचे घर गाठले. पीडितेवर त्याने अत्याचार केला. दरम्यान, काहीच वेळात मुलीची आई घरी आली. यावेळी अल्पवयीन मुलगा घरी संशयास्पद दिसून आल्याने तिने त्याला विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व घरून निघून गेला. आरोपी गेल्यानंतर आईने मुलीकडे विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. आईने रामनगर पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी  भादंवि कलम ३७६ आणि पोस्को कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला मात्र, आरोपीला अटक केली नव्हती. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना माहिती होताच त्यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून आरोपीच्या अटकेबाबत चौकशी केल्यानंतर रविवारी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

मुंबई : ५५ वर्षीय डॉक्टरने केला २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार

दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.