सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
थदाळे ( ता. माण ) येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी मुलीची आई व मामा यांनी आज संशयित विरोधात दहिवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. थदाळे येथील शेतमजूर करणाऱ्या कुटुंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्यांच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या 32 वर्षीय युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे वय कमी असून व भोळा स्वभाव असलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले असल्याची माहिती मुलीच्या आई व मामा यांनी माहिती दिली. संशयित युवकांवर दहिवडी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटना ही मुलीचे आई-वडील शेतमजूर असल्याने शेजारील असलेल्या मोही गावातील पिसाळ सर यांच्या शेतामध्ये कामाला गेले होते. सायंकाळी सहा वाजता शेतातील सर्व काम उरकून घरी आले असता. तेव्हा मोठी मुलगी घरी नाही हे दोन लहान भावंडांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही शाळेमध्ये होतो. तेव्हा 12 वाजता घराला कुलूप लावून ती आम्हाला घराची चावी देण्यासाठी शाळेमध्ये आली होती. तेव्हा ती आम्हाला काहीही न बोलता निघून गेली. त्यानंतर मुलीच्या आई आणि वडिलांनी रात्री उशिरापर्यंत गावांमध्ये शोध घेतला व पाहुण्यांकडे पण विचारपूस केली कुठेही शोध लागला नाही.
अंधार पडत चालला होता जसजसा अंधार होत चालला होता तसा मुलींच्या आई-वडिलांची धडधड आणखी वाढत चालली होती. शेवटी मुलीच्या आत्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिची आत्या घरी नसल्याचे समजले. मुलीच्या दुसऱ्या आत्याचा संशयित मुलगा हा देखील घरी नसल्याचे समजले. तेव्हा दाट संशय आला की याच मुलाने मुलीला फूस लावून पळविले असणार त्याच संशयाच्या आधारे आज सदर युवकावर दहिवडी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरचा युवक हा वारंवार थदाळे येथील आपल्या मामाच्या घरी यायचा. मामाच्या मुलीशी मनमोकळ्या गप्पाही करायचा. गोड गोड गप्पा करून मुलीला भुरळ पाडून, फूस लावून पळविले असणार असा संशय आहे. तरी सदर युवकाला लवकरात लवकर ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलगी आमच्या स्वाधीन करावी, असे मुलीच्या आईचे म्हणणे आहे.