व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड परिसरातील विद्यानगर येथे जमावाचा हॉटेलवर हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्यानगर येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वादावादीचे घटना घडली. दारू मागितल्यास ती न दिल्याचा राग मनात धरुन जमावाने हॉटेलवर हल्ला केला. यामध्ये जमावाने दगडफेक करत लाकडी दांडके सायलेन्सर व बाटल्यांनी हॉटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-विटा रस्त्यावरील सैदापूर -विद्यानगर गावच्या हद्दीतील कृष्णा कॅनॉल जवळील हॉटेल हर्ष एक्झिक्युटिव्हमध्ये विद्यानगरमधीलच एक जण शनिवारी दुपारी गेला होता. त्यावेळी त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडे दारुची उधारीवर मागणी केली. त्यावेळी तेथील हॉटेल कर्मचाऱ्यांने उधारीवर दारू देण्यास नकार
दिला. त्यामुळे दुपारी त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर
हॉटेलमधील काही जणांनी उधारीवर दारु मागणाऱ्या युवकाला मारहाण करून तेथून हाकलून दिले.

त्यानंतर संबंधित युवक रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुमारे पंधरा जणांचा जमाव घेऊन पुन्हा हॉटेल हर्ष एक्झिक्युटमध्ये गेला. तेथे त्यांने पुन्हा उधारीवर दारु देण्याची मागणी केली. मात्र, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी नकार देताच जमावाने हॉटेलवर हल्ला केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करत लाकडी दांडके सायलेन्सर तसेच बाटल्यांनी हॉटेलची तोडफोड केली.

हल्यात हॉटेलच्या काचा फोडल्या असून साहित्यासह बोर्डचे नुकसान केले आहे. हॉटेलवर जमावाने हल्ला केल्याची माहिती मिळताच कराड गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस उपनिरीक्षक चोरगे
यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. हल्ला केलेल्या जमावामध्ये कोण कोण होतं याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. या घटनेची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.