‘या’ सरकारी योजनेतून मिळू शकते 10 हजार रुपये मासिक पेन्शन; चला जाणून घेऊ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, बहुतेक लोकं रिटायरमेंटनंतरचे प्लॅनिंग करत राहतात. खाजगी नोकऱ्या किंवा छोटे व्यवसाय असलेल्यांना वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता असते. जर तुम्ही रिटायरमेंटनंतरच्या पेन्शनचा विचार करत असाल तर अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल.

कमी गुंतवणुकीत पेन्शनची गॅरेंटी देण्यासाठी ही योजना जास्त चांगली दिसते. सध्या, अटल पेन्शन योजनेअंतर्गत, सरकार 60 वर्षांनंतर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची गॅरेंटी देते. म्हणजेच वर्षाला तुम्हाला 60,000 रुपये पेन्शन मिळेल. जर पती-पत्नी दोघेही गुंतवणूक करत असतील तर दोघांनाही पेन्शन मिळू शकते. म्हणजेच, जर तुम्ही 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 1,20,000 रुपये आणि मासिक 10,000 रुपये पेन्शन मिळेल. सरकारच्या या योजनेत 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते. अटल पेन्शन योजनेचे फायदे जाणून घेऊयात.

60 नंतर वार्षिक 60,000 रुपये पेन्शन दिली जाईल
अटल पेन्शन योजनेचा उद्देश प्रत्येक विभागाला पेन्शनच्या कक्षेत आणणे आहे. मात्र, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने सरकारला अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत जास्तीचे वय वाढवण्याची शिफारस केली आहे.

या योजनेंतर्गत, दरमहा खात्यात निश्चित योगदान दिल्यावर रिटायरमेंटनंतर 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. सरकार दर 6 महिन्यांत केवळ 1239 रुपये गुंतवल्यानंतर 60 वर्षांनंतर प्रति महिना 5000 रुपये म्हणजेच वार्षिक 60,000 रुपये आजीवन पेन्शनची गॅरेंटी देत ​​आहे.

दरमहा 210 रुपये द्यावे लागतील
सध्याच्या नियमांनुसार, वयाच्या 18 व्या वर्षी, मासिक पेन्शनसाठी योजनेत जास्तीत जास्त 5000 रुपये जोडल्यास, तुम्हाला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिले तर 626 रुपये आणि सहा महिन्यांत 1,239 रुपये द्यावे लागतील. मासिक 1,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला दरमहा 42 रुपये द्यावे लागतील.

तरुण वयात सामील झाल्यास जास्त फायदे मिळतील
समजा तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी 5 हजार पेन्शनसाठी सामील झालात तर 25 वर्षांसाठी तुम्हाला दर 6 महिन्यांनी 5,323 रुपये जमा करावे लागतील. अशा परिस्थितीत तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये असेल, ज्यावर तुम्हाला 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. तर वयाच्या 18 व्या वर्षी सामील झाल्यावर तुमची एकूण गुंतवणूक फक्त 1.04 लाख रुपये असेल. म्हणजेच, त्याच पेन्शनसाठी सुमारे 1.60 लाख रुपये अधिक गुंतवावे लागतील.

सरकारी योजनेशी संबंधित इतर गोष्टी
तुम्ही पेमेंट, मासिक गुंतवणूक, त्रैमासिक गुंतवणूक किंवा अर्धवार्षिक गुंतवणूक यासाठी 3 प्रकारच्या योजना निवडू शकता.

आयकराच्या कलम 80CCD अंतर्गत, त्याला कर सवलतीचा लाभ मिळतो.

सदस्याच्या नावाने फक्त 1 खाते उघडता येईल.

जर सदस्याचा मृत्यू 60 वर्षापूर्वी किंवा नंतर झाला असेल तर पेन्शनची रक्कम पत्नीला दिली जाईल.

Leave a Comment