निर्भया पथकाच्या पोलिसावर काॅलेज परिसरात चाकूने हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरामध्ये हुल्लडबाज तरूणांनी पोलिसांवर चाकूने हल्ला केला. कोरेगाव येथे तरूणांच्यात गोंधळ सुरू असताना अटकाव केल्याने थेट निर्भया पथकांच्या पोलिसांवर हा हल्ला करण्यात आला. यामध्ये एक पोलिस जखमी झाला असून एकाला धक्काबुक्की करण्यात आला. या प्रकरणातील दोन्ही हल्लेखोर तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव शहरात काॅलेज परिसरात दुचाकीवरून हुल्लडबाजी करत दोन युवक निघाले होते. रस्त्यावर गोंधळ निर्माण झाल्याने निर्भया पथकाच्या पोलिसांनी दोघांना तेथून अटकावले. तेव्हा दुचाकीवरून शहरात दहशत निर्माण करत एकाने धारदार चाकूने पोलिसांवरच हल्ला चढवला. सादिक शेख असे पोलिसावर चाकुने हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तसेच दुसऱ्या पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली.

कोरेगाव शहरातील डी. पी. भोसले कॉलेज समोर कोरेगांव ते रहिमतपुर जाणाऱ्या रस्त्यावर सनी जाधव (रा. आरफळ कॉलनी- कोरेगांव), सादिक शेख (रा. कळकाई गल्ली- कोरेगांव) यांनी दुचाकीवरून आपसात संगणमत करुन गोंधळ घातला होता. या दोघांना कोरेगाव पोलिासंनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिस अमर चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.