राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील बिगर भाजप सरकार केंद्रात येणार- मल्लिकार्जुन खर्गे

rahul gandhi kharge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील बिगर भाजप सरकार सत्तेत येईल असं मोठं विधान काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे .

जैनी आज संसदेत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान केले तेच सरकार केंद्रात हटवण्याची भाषा करत आहे. जेव्हा आम्ही संसदेत विधेयकाला विरोध करायचो तेव्हा टीआरएस भाजपला पाठिंबा देत असते पण तरीही ते म्हणतात की ते बिगरभाजप सरकार आणू. जर कोणतेही बिगर-भाजप सरकार स्थापन होत असेल तर ते काँग्रेसच आहे, जे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली बिगर-भाजप सरकार स्थापन करेल असं खर्गेंनी म्हंटल.

यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला. केंद्र सरकारला भाषेसह इतर अनेक कारणांवरून देशाचे विभाजन करायचे आहे. हैदराबाद हे एक असे ठिकाण आहे जिथे सर्व धर्माचे लोक एकोप्याने राहतात. काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या इच्छेनुसार काम करतो त्यामुळे जनतेच्या मागणीनुसार त्यांना तेलंगणा नाव देण्यात आले. हा ऐतिहासिक निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला असे खर्गे म्हणाले.