“I Love You”; राज ठाकरेंच्या भाषणावेळी घडला विचित्र प्रसंग; कार्यक्रमातील वातावरण गेले बदलून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा स्वभाव प्रचंड मिश्किल स्वरूपाचा आहे. त्यांच्या बेधडक आणि स्पष्ट बोलण्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या मोठा चाहता वर्ग आहे. राज ठाकरे देखील सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतात. नुकतंच मनसेकडून महाराष्ट्र नवनिर्माण रीलबाज पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातच राज ठाकरेंसोबत एक गमतीशीर प्रसंग घडला. ज्यामुळे संपूर्ण सभागृहात हशा पिकला .

मनसेकडून आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण रीलबाज पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांचे बेधडक भाषण सुरु होते. यावेळी ते रिल स्टारचे कौतुक करत होते. अशातच गर्दीत बसलेला एक व्यक्ती उठला आणि “आय लव्ह यू राजसाहेब” असे राज ठाकरेंना उद्देशून म्हणाला. यावर क्षणाचा ही विलंब न करता राज ठाकरे देखील लव्ह यू म्हणाले. राज ठाकरेंच्या या उत्तरावर सर्वांना हसू आले. तसेच सभागृहात शिट्या आणि टाळ्यांचा वर्षाव झाला. त्यानंतर, “असं मी मायकल जॅक्सनचं पाहिलं होतं. लव्ह यू असं त्याने केलं होतं” असं राज ठाकरे मायकल जॅक्सन चा आवाज काढत म्हणाले.

पुढे राज ठाकरे यांनी कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व रील स्टारचे कौतुक केले. तसेच तुमच्यामुळे समाज वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करतो असेही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान मनसेकडून हा कार्यक्रम महाराष्ट्रतील रिल स्टारसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक रिलबाज आले होते. दरम्यान, यावेळी “आपल्या देशात अनेक वर्षे गायक, संगीतकार, लेखक, कवी, कलाकार झाले. सिनेमा, नाट्यक्षेत्र, गायन, शास्त्रीय संगीत या विविध अंगांमध्ये आज तुम्हीही (रील्स-स्टार) येता. ज्यामध्ये संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद आहे. जो समाज आपली सुख-दुःख सर्व गोष्टी विसरतो आणि तुमच्यामध्ये रममाण होतो, ही ताकद किती मोठी असेल.” अशा शब्दात राज ठाकरेंनी महाराष्ट्रतील सर्व रिलबाजचे कौतुक केले.