चीनवरून आलेल्या व्यक्तीला Corona ची लागण; संपूर्ण घर सील

Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये (China) कोरोनाने उद्रेक केला आहे. कोरोनाने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे एकीकडे केंद्र सरकार अलर्ट झालं असतानाच चीनमधून आग्र्याला आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हा ४० वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी चीनमधून आग्र्यात (Agra) आला होता. त्यांनतर खासगी लॅबमध्ये त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने या व्यक्तीचे घर सील केलं आहे. या तरुणावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु असून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, चीनमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता भारत सरकार हाय अलर्टवर आहे. भारताने कोविड-19 महामारीच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे सुरू केले आहे. केंद्र सरकारने चीन आणि जपानसह पाच देशांतून येणाऱ्या व्यक्तींसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. याशिवाय, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.