पुण्याहून सहलीसाठी निघालेली शाळेची बस ताम्हिणी घाटात उलटली; 2 महिलांचा मृत्यू तर 55 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज सकाळी रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हिणी घाटात शाळेची एक खाजगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याचे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 55 जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी महाड, माणगाव येथून बचाव पथके आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे तात्काळ जखमींना रुग्णालयात हलवले गेले.

अपघात कसा झाला?

आज सकाळच्या वेळी पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना त्यांच्या बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला. ताम्हिणी घाटातील अवघड वळणावरून जात असतानाच ही शाळेची बस उलटली. मुख्य म्हणजे, अवघड वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण नियंत्रण सुटले असल्याचे देखील म्हटले जात आहे. या अपघातानंतर बसमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. या सर्वांना कोंडेघर गाव राहणाऱ्या गावकऱ्यांनी सुखरूपरीत्या बाहेर काढले. त्यानंतरच अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर एकूण 55 जण जखमी झाले.

दरम्यान, आज ताम्हिणी घाटात शाळेची बस उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पुढे अपघाताची माहिती मिळतात जवळील गावातील लोकांनी येऊन मदत कार्य सुरू केले. तसेच पोलीस आणि रुग्णवाहिकेला देखील याबाबतची माहिती दिली. या अपघातात जखमींची संख्या जास्त असल्याने सर्वांना लगेच उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आले. मुख्य म्हणजे, या अपघातात दोन महिलांचा मृत्यु झाला.