कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील प्रितिसंगमावर पोहायला गेलेला पंधरा वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. सोहम शशिकांत कुलकर्णी (वय- १५ सध्या रा. सोमवारपेठ कराड) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रंगपंचमी खेळून काही मुले पोहायला प्रितिसंगमावर गेली होती. त्या मुलांसमवेत सोहम कुलकर्णी हा सुद्धा गेला होता. पोहत असताना सोहमला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न काही मुलांनी केला. मात्र खोल पाण्यात तो बुडाला.
कृष्णा- कोयना नदीचा संगम असलेल्या प्रितिसंगम घाटावर ही दुर्देवी घटना घडलेली आहे. सोहम पाण्यात बुडल्याचे समजताच सोमवार पेठेतील तसेच त्याचे नातेवाईकांनी घाटावर गर्दी केली होती. सदरच्या घटनेची नोंद कराड शहर पोलिसात रात्री उशीरा झाली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group