शिऊर बोरसर रस्त्यावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : वैजापूर जिल्ह्यातील शिऊर -बोरसर रोडवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सुनील वनकर डुकरे, श्रावण भागिनाथ मोरे असे या मृताचे नाव असून दोघेही शिरूर जवळील बोरसर या गावात राहत होते. आणि धोंडीराम बाबासाहेब मोरे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी धाव घेतली.

हाती आलेल्या माहितीनुसार, तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. वळण आल्यावर दुचाकीचा तोल जाऊन हा अपघात झाल्याचे समजले आहे. या अपघातात दुचाकीचा पूर्ण चुराडा झाला असून दोघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि जखमी झालेल्या व्यक्तीला औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखजी शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर आर जाधव, पोना बकले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Comment