हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या धावत्या युगामध्ये अनेक जण नवीन घर बांधण्याऐवजी रेडिमेड घरी घेण्याचा पर्याय जास्त निवडतात. परंतु अनेकवेळा अशा घरांमध्ये जुने पुराणे रहस्य लपल्याचे समोर येते. अशीच एक धक्कादायक घटना ब्रिटनमधील दांपत्यासोबत घडली आहे. या दांपत्याने 1900 मध्ये बांधलेले जुने घर खरेदी करण्यासाठी आपली सर्व बचत गुंतवली. परंतु या घरांमध्ये राहिला गेल्यानंतर त्यांना एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली ज्यामुळे त्यांचा पायाखालची जमीन सरकली. ती गोष्ट नेमकी काय होती चला जाणून घेऊयात….
जुन्या पुराण्या घरांमध्ये राहण्याचे आवड असल्यामुळे ब्रिटन मधल्या या दांपत्याने 1900 वर्षे जुने घर खरेदी केले होते. या घरामध्ये राहिला आल्यानंतर त्यांनी साफसफाईला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की घरामध्ये एक भुयारी रस्ता आहे. खोलीत असलेल्या गालिच्याखालच्या तुटलेल्या लाकडातून त्यांना काही पायऱ्या दिसत होत्या. ज्यावेळी हे दांपत्य पायऱ्या उतरून खाली गेले त्यावेळी त्यांना धक्का बसला. कारण, त्यांच्या याच घराखाली एक खोली होती. ही खोली फक्त रिकामीच नसून ती एक दारूचे कोठार होती.
दारूचा हा कोठारा आणि एक काळापासून बंद असल्यामुळे त्यातून खूप दुर्गंधी येत होते. हे सर्व पाहून सुरुवातीला या नामपत्याला काय करावे हे सुचलेच नाही. परंतु त्यांनी नीट विचार करून या कोठाऱ्याची दुरुस्ती केली. आता हे दाम्पत्य दारूची कोठार बिअर बार म्हणून वापरतात. त्यांनी या कोठाऱ्याला नवीन रूप दिले आहे. ज्यामुळे त्यांच्या घराची शोभा आणखीन वाढली आहे. याबाबतची माहिती स्वतः दांपत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.