सलून चालू ठेवणाऱ्या दुकानदाराचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू, औरंगाबादमध्ये तणावपूर्ण वातावरण (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवत दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. दोषीवर कारवाई व्हावी, यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दुपारपर्यंत शेकडो नागरिकांनी पोलिस ठाण्यांच्या आवारात गर्दी केली होती. फिरोज खान कदिर खान (वय- 50, रा.उस्मानपुरा परिसर) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिरोज यांचे उस्मानापुरा परिसरात सलून असून दुकान आहे. दुकान चालु असल्याने कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला, असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह उस्मानपुरा पोलीस ठण्यासमोर ठेवला होता.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/937178117111350

जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यातही घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकानी घेतली आहे. पोलीस ठाणे आवारात शेकडो नागरिकांची गर्दी असून पोलीस नातेवाईकांची समजूत काढत आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने दंगा काबू पथक दाखल झाले होते.