दुर्दैवी! शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

संगमनेर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगर ( Ahmadnagar) जिल्ह्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण भावा चा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. संगमनेर ( Ahmadnagar) तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा गावा अंतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे रविवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. जयश्री बबन शिंदे आणि आयुष बबन शिंदे अशी या मृत भावा- बहिणींची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले आहेत.

काय घडले नेमके ?
पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती या ठिकाणी बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. आज सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण-भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. यादरम्यान आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. आपला भाऊ शेततळ्यात पडल्याचे समजताच त्याला वाचवण्यासाठी बहिण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली.

मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडाले. या दुर्दैवी घटनेमुळे पिंपळगाव देपा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांना शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र त्या अगोदरच बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दोघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर ( Ahmadnagar) कुटीर रूग्णालयात पाठवण्यात आले.

Leave a Comment