नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जणाचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 15-16 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निलेश बाप्पू कन्नोर असे या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मालेगाव तालुक्यातील निमशेवडी येथील रहिवासी होता. हे सर्व विद्यार्थी दोधेश्वर येथे बंदोबस्तासाठी गेले होते.
बंदोबस्ताहून परतत असताना अपघात
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दोधेश्वर घाटात बागलाण अकॅडमीचे हे विद्यार्थी बंदोबस्तासाठी गेले होते. बंदोबस्तानंतर परतत असतानाच घाटातच त्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 40 विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये 15 ते 16 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
काल श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दोधेश्र्वर या ठिकाणी जात असतात. त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांची बंदोबस्तासाठी मदत होत असते. हे सर्व विद्यार्थी बागलाण अकॅडमीत प्रशिक्षण घेत होते. बागलाण अकॅडमी ही सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण देणारी खाजगी संस्था आहे. दोधेश्वर येथे प्राचीन महादेवाचे मंदिर असून, श्रावणात दर सोमवारी येथे यात्रा असते. या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे येथे बंदोबस्तासाठी बागलाण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना नेण्यात आले होते. मात्र बंदोबस्तासाठी त्यांना कुणी आणि का पाठवले हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???