हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये नवनवीन महामार्ग बनत असताना दुसरीकडे रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ होत चाललेली दिसत आहे. बुधवारी 27 डिसेंबर रोजी पहाटे करमाळा येथील पांडे गावाजवळील फिसरे रस्त्यावर कंटेनर आणि कारची धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये कारमधील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर करमाळा जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेत असताना एक व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. सध्या इतर जखमी झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक सालसेकडून तवेरा गाडी शिर्डी येथे दर्शनासाठी निघाली होती. तर फरशी घेऊन निघालेला कंटेनर करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता. परंतु, पहाटे सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलावरून वळण घेताना या गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाला, तर तवेरा गाडी रस्त्याच्या कडेला उलटी पडली.
यानंतर अपघाताचा आवाज एकदाच गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढे या युवकांनी एका अंगावर गाडी करून जखमींना बाहेर काढले. तसेच पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी सर्व तपासणी केल्यानंतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समोर आले. तसेच, काही वेळानंतरच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या एका व्यक्तीचा देखील जीव गेल्याचे समोर आले. या सर्व घटनेमुळे काही वेळासाठी फिसरे रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. जिला पुन्हा सुरळीत करण्यात आले.