हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्याहून कोकणात (Pune To Konkan) फिरायला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. कोकणचे सौन्दर्य पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यातच नोकरीनिमित्त कोकणातील अनेकजण पुण्याला असतात. त्यामुळे कोकण ते पुणे वाहतूक सातत्याने सुरु असते. या पार्श्वभूमीवर या मार्गांवरील वाहतूक वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिसरा मार्ग सुरु होणार आहे. याचा रूट कसा असेल ते जाणुन घेऊयात.
राजगड आणि रायगडला जोडला जाणार मार्ग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवास स्थानातून हा मार्ग तयार केला जाणार आहे. हा मार्ग राजगड ते रायगड असा असल्यामुळे हे दोन शहर एकमेकांना जोडले जाणार आहेत. आणि त्यामुळे याचा पुणेकरांना फायदा होणार आहे. या मार्गमुळे पुणेकर कोकणात सहजरीत्या जाऊ शकणार आहे. तयार होणारा हा तिसरा मार्ग एकूण 13 किलोमीटर लांबीचा असून यासाठी शासनाने 30 कोटी रुपयांना मंजुरी दिलेली आहे. तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 25 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच अधिवेशनात या मार्गासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. मार्गाला मिळालेल्या निधीमुळे हा मार्ग चांगल्या दर्जाचा होईल अशी आशा आहे.
कसा असेल रूट?
पुणे ते कोकण जाण्यासाठी तयार होणारा तिसरा मार्ग हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या भोर्डे ते महाड येथील शेवते घाट दरम्यानपासून सुरु होणार आहे. 9 जानेवारीला या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलं आहे. पुण्यातील लोक कोकणाचे निसर्ग सौन्दर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येथे आपल्या कुटुंबासोबत तसेच मित्र – मैत्रिणींसोबत जात असतात. त्यामुळे रस्ते वाहतूक ही चांगली असणे आवश्यक असते. त्यामुळे हा मार्ग तयार झाल्यानंतर पर्यटणास चालना मिळणार आहे. केवळ पुणे आणि कोकणच नव्हे तर या मार्गदरम्यान येणाऱ्या सर्वच मार्गांना याचा फायदा होणार आहे. तसेच रोजगार आणि पर्यटनाच्या संधीही वाढणार आहेत.