हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता दिनो मोरिया वर ईडी ने कारवाई केली . संदेसरा घोटाळा प्रकरणात ईडीने मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांवर मोठी कारवाई करत ईडीने या अनुक्रमे 1.4 कोटी आणि 2.41 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात नितेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की दिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे होता. याप्रकरणात आणखी खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील. आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावाही यावेळी नितेश राणे यांनी केला.
बॉलिवूडमध्ये चार-पाच चित्रपट करण्यापलीकडे दिनो मोरियाची विशेष ओळख नाही. मात्र, हा दिनो मोरिया मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कोणतेही काम चुटकीसरशी करुन देऊ, असे इतरांना सांगत फिरतो. दिनो मोरियाची कोणाशी मैत्री आहे?, असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला.
Dino is the Waze of BMC !!
If one digs more … lot of penguins will come out running..
We have the proofs!!— Nitesh Rane (@NiteshNRane) July 3, 2021
नक्की काय आहे प्रकरण –
संदेसरा घोटाळा प्रकरणात ईडीने मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांवर मोठी कारवाई करत ईडीने या अनुक्रमे 1.4 कोटी आणि 2.41 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी तब्बल 14500 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन एका बँकांना चुना लावला होता. याप्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान सिद्दीकी आणि दिनो मोरिया यांचेही आर्थिक कनेक्शन असल्याची माहिती पुढे आली होती