सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे- बंगळूर महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली. रस्त्यात आलेल्या एका वेडसर व्यक्तीला वाचविण्याच्या नादात हा अपघात झाला. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून एक महिला व एक पुरूष गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर आज शुक्रवारी दि. 4 रोजी दुपारी कडाक्याच्या उन्हात एका दुचाकी क्रमांक (MH- 14- HZ- 4941) दोघेजण प्रवास करत होते. वाई तालुक्यातील वेळे येथे एक वेडसर व्यक्ती रस्त्यात आल्यानंतर त्याला वाचविण्याचा प्रयत्न दुचाकी चालकाने केला. तेव्हा गाडीवरील ताबा सुटल्याने रोडच्या बाजूला संरक्षण जाळीवर दुचाकी धडकली.
दुचाकीवर निकिता मंजुनाथ मूराळे (वय-32) व मंजुनाथ कामोपा मूराळे (वय- 36) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना वाईच्या गीतांजली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास भुईंज पोलीस स्टेशनचे हवालदार घाडगे करीत आहेत.