सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील पोवई नाक्यावरील रेणूका पेट्रोल पंपावर एका दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. त्यावेळी तेथील कर्मचारी जावेद शेख याने घटनेचे गार्भिय ओळखून फायरचा सिलेंडर फोडून आग विझविली. कर्मचाऱ्यांच्या प्रसंग सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला.
त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. कर्मचारी जावेद शेख याच्या धाडसाचे कौतुक करीत पंपाचे मालक रितेश रावखंडे यांनी सत्कार केला. घटना पूर्ण पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.
सातारा शहरातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी आग लागल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पेट्रोल पंपावर दुचाकी पेटलेल्या ठिकाणी शेजारीच अगदी काही फुटांवर ती पेट्रोलचे भरलेला ट्रक उभा होता. या आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता.