हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुसळधार पावसात आपण वीज कोसळताना पाहिले तर आपल्याच अंगावर काटा येतो. आजवर आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या भागांमध्ये कधी झाडांवर, घरांवर, किंवा एखाद्या सपाट जागेत विज कोसळतानाचे व्हिडिओ पाहिले आहेत. या व्हिडिओमधूनच आपल्याला विजेची तीव्रता आणि दाहकता लक्षात येते. मात्र सध्या, सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये थेट एका चालत्या कारवरच वीज कोसळलेली दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या देखील पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही.
आजवर आपण रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एखादया अपघातापेक्षा देखील जास्त भयानक आहे. या व्हिडिओमध्ये थेट आकाशातून वीज एका गाडीवर कोसळली आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, रहदारीच्या रस्त्यावरून एक कार जात आहे. आणि अचानक ढगातून वीज थेट त्या कारवर कोसळते. थोड्याच वेळात या कार मधून धूर येऊ लागतो. तर रस्त्यावरील लोक काल चालकाला वाचवण्यासाठी ताबडतोब कारच्या दिशेने धावतात. मात्र तोपर्यंत कारचालक बाहेर आलेला असतो.
https://twitter.com/OTerrifying/status/1693732775340507269?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1693732775340507269%7Ctwgr%5E47ae7a1b2968c54b11ada77923b6d1c3d987d4bb%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Ftwitter.com%2F
रस्त्यावर घडलेला हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. दोन मिनिटात सर्वजण त्या कारमधील दुर विझविण्याचा प्रयत्न करतात. हे दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर काटा येतो. दरम्यान, या वीज पडलेल्या कारचा व्हिडिओ ट्विटरवर oddly Terryfing अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखोंच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. तर तितक्याच कमेंट्स करण्यात आल्या आहेत. काहींनी तर, “”हा सर्वात भयंकर प्रसंग असतो” अशा देखील कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, पावसाच्या वातावरणात वीज कोसळण्याची भीती सर्वात जास्त असते. राज्यात वीज कोसळल्यामुळे नागरिकांच्या झालेल्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिथे वीज कोसळण्याची भीती असते, त्या ठिकाणी थांबू नये किंवा सावधगिरी बाळगावी असे आवाहन नेहमी करण्यात येते. मात्र वीस कोसळण्याचा अंदाज नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात.