कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील पोवई नाका येथे बॅनर लावले आहेत. दरम्यान बॅनर लावलेल्या ठिकाणाहून चालत निघालेल्या महिलेच्या डोक्यात बॅनर अचानक पडला. यामध्ये संबंधित महिला ही जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये बॅनरखाली असलेल्या पोलिस चौकीचे देखील दोन तुकडे झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरातील पेठ रविवार पोवई नाकाश एकूण पाच ठिकाणी पालिकेकडून बॅनर लावण्यास मनाई करण्यात आहे. शहरातील 5 ठिकाणी नो फ्लेक्स झोन म्हणून पालिकेकडून घोषित करण्यात आली आहे. या ठिकाणांमध्ये सातारा शहरातील पोवई नाका हे ठिकाण येत असल्याने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या नियमाचे उल्लंघन करत संबंधित ठिकाणी बॅनर लावले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी एक महिला बॅनर लावलेल्या ठिकाणाहून चालत निघाली होती.
Satara News : शिवेंद्रसिंहराजेंचा बॅनर डोक्यावर पडून महिला जखमी तर पोलीस चौकीचे दोन तुकडे
जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलेस उपचारासाठी दाखल pic.twitter.com/TM2Sd7MgEA
— santosh gurav (@santosh29590931) March 29, 2023
यावेळी अचानक चालत निघालेल्या पाहिलेल्या अंगावर आ. शिवेंद्रराजेच्या वाढदिवसाचा बॅनर पडला. यावेळी बॅनर खाली तिच्याशी पोलीस चौकीची इमारतही आली. या अपघातात पोलीस चौकीचे नुकसान झाले तर संबंधित महिलेच्या हाताला व डोक्याला मार लागला. यावेळी महिलेस पिसरातील नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर पालिकेच्या वतीने तो बॅनर हटवण्यात आला. आता वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात लागलेल्या बेकायदेशीर बॅनरवर पालिका कारवाई करणार का? असा सवाल सर्व सामान्य सातारकर करत आहेत.