पत्नीशी फोनवर बाेलल्याच्या रागातून रेल्वे ट्रकवरील कामगारांचा कोयत्याने खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथे पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून पतीने एका रेल्वे ट्रॅकच्या कामावरील कामगाराचा कोयत्याने वार करून खून केला आहे. मनोहर श्रीकांत कांबळे (वय ३५, मूळ रा. मांजरेवाडी ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे खून झालेल्याचे, तर शरद सुग्रीव सरवदे (रा. चिंचणेर वंदन) असे खून करणाऱ्याचे नाव आहे. संशयिताला तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी बांधकामावरील अभियंता प्रतीक विठ्ठल गवळी (वय 26, मूळ रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सातारा ते कोरेगाव या रेल्वे ट्रॅकवर त्याच्या कंपनीमार्फत काम हो सुरू आहे. यासाठी लागणारे कामगार सध्या चिंचणेर निंब गावच्या हद्दीत रेल्वे गेटलगत राहतात. मनोहर कांबळे ही तेथे कामगार होता. सर्व कामगारांना जेवण देण्याचे काम शरद सरवदे व त्याचे कुटुंबीय करत होते. त्यामुळे कांबळेची सरवदे कुटुंबीयांशी ओळख होती. बारा दिवसांपूर्वी मनोहर व आपली पत्नी फोनवर बोलत असल्याचे सरवदे याला समजले. त्या वेळी त्यांच्यात वादावादी झाली होती.

रात्री कामगार साडेनऊला एकत्र जेवणासाठी बसले. ज्या वेळी मनोहरला त्यांनी जेवणासाठी बोलावले; परंतु तो फोनवर बोलत होता. तो बोलत बोलत जुन्या रेल्वे गेटच्या वडाच्या झाडाकडे गेला. या वेळी अचानक त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे सर्व कामगार तेथे गेले. तेव्हा मनोहर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर सरवदे तेथून कोयता घेऊन पळून जात असल्याचे इतरांना दिसले. कामगारांनी मनोहरला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस घटनास्थळी व रुग्णालयात गेले. घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पंचनामा करून संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे दुसरे पथक पाठवले. पहाटे सरवदेला अटक करण्यात आली.

Leave a Comment