काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढणार, आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल- नाना पटोले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत काँग्रेस सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढेल असा पुनरुच्चार केला आहे.

भाजपमधून अनेक लोक काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत, माझ्याकडे मोठी लिस्ट तयार आहे असेही नाना पटोले यांनी म्हंटल. नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असलेले ते भाजप नेते कोण? असा सवालही विचारला जात आहे.

तसेच भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. त्याचबरोबर भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असंही पटोले यांनी म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment