हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर सिक्कीममधील नकुला येथील मोगुथांग येथे भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यात नुकतीच एक चकमक झाली. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये एकच हाणामारी झाली. ‘द क्विंट’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या वेळी भारतीय सैन्य दलाच्या एका तरूण लेफ्टनंटने चीनच्या पीपल्स लिबरेशन ऑफ आर्मी (पीएलए) च्या मेजरला इतक्या जोराने ठोसा लगावला की त्याच्या नाकातून रक्तच येऊ लागले.
‘हे सिक्कीम तुमचे नाही’
हा तरुण अधिकारी भारतीय सैन्याच्या इन्फंट्री युनिटमध्ये तैनात आहे. या लेफ्टनंटने गेल्याच आठवड्यात चीनी सैन्याला मुगुथांगमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावर चिनी सैन्यप्रमुख या लेफ्टनंटवर ओरडले की, “ही सिक्कीम तुमची भूमी नाहीये, ती भारताची सीमा नाहीये.ताबडतोब परत जा.’ यावर त्या तरुण लेफ्टनंटला राग अनावर झाला. तो त्या चिनी मेजरवर पुन्हा ओरडला आणि तो म्हणाला, ‘काय ?सिक्कीम आमची सीमा नाही ? आपण काय बडबड करत आहात? यावर, पीएलएचा मेजर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याजवळ गेला, जो एक कॅप्टन होता. दरम्यान, हा लेफ्टनंट चिनी मेजरच्या जवळ आला आणि त्याने त्याला एक जोरदार ठोसा मारला.
पंच खाऊन जमिनीवर पडला चिनी मेजर
या भारतीय लेफ्टनंटच्या एका ठोस्यातच तो चिनी मेजर खाली पडला. ज्याच्यावर नाव लिहिले होते तो त्याचा बॅजसुद्धा बाजूला पडला. नंतर या लेफ्टनंटच्या उर्वरित लेफ्टनंटनी त्यांना मागे खेचले. वेबसाइटनुसार, या भारतीय लेफ्टनंटचे संपूर्ण कुटुंब हे भारतीय सैन्यात सेवा बजावत आहेत. त्याचे आजोबा रॉयल व त्यानंतर भारतीय वायुसेनेचे एजंट आहेत, तर त्याचे वडील सध्या भारतीय सैन्य दलात कर्नल आहेत. जर स्त्रोतांचा विश्वास धरला तर या लेफ्टनंटच्या शौर्यामुळे भारतीय सैन्य भलतेच प्रभावित झाले आहे परंतु या तरूण अधिकाऱ्यावर मोठी भांडणे करण्यासाठी उकसवल्या प्रकऱणी दोषी धरण्यात आले आहे. भारतीय सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनीही या आपल्या लेफ्टनंटला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
लेफ्टनंटला त्याच्या कृत्याबद्दल दु: ख झालेले नाही
सोबत असलेले सीनियर ऑफिसर या भांडणात लेफ्टनंटला दोषी असल्याचे सांगत असतानाच वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर मात्र या लेफ्टनंटच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आहेत. त्याचबरोबर कोलकाता आणि सुकाना येथील हेडक्वार्टरमध्ये या लेफ्टनंटला सन्मानित करण्याची तयारीही सुरू केली आहे. खराब हवामानामुळे सीनियर कमांडर्स सध्या मुगुथांगला पोहोचू शकत नाहीयेत. दुसरीकडे, लेफ्टनंटला लेफ्टनंटला त्याच्या या कृत्याबद्दल कसलेही दु: ख झालेले नाही आहे. तथापि, तो थोडा निराश जरूर झाला आहे कारण त्याला आता या फ्रंट लोकेशन वरून हटवण्यात आले आहे.
सहकारी जवान बोलत आहे – चांगलाच धडा शिकवला
या लेफ्टनंटचे मात्र त्याचे सहकारी जवान कौतुक करीत आहेत आणि त्यांनी ‘चिनीना योग्य धडा शिकवला’ असं म्हणत त्याचा आनंद व्यक्त केला आहे. एका सीनियर ऑफिसर नुसार हा लेफ्टनंट त्याच्या सैन्यासाठी एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीये. ते म्हणतात की तरुण अधिकारी अंगाने खूप बारीक पण अतिशय तापट आहेत. भारतीय सैन्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी चिनी सैनिकांशी झालेल्या हाणामारीची पुष्टी केली आहे.
Incidents of face-off between Indian and Chinese soldiers in North Sikkim did take place. Aggressive behaviour & minor injuries occurred on both sides, troops disengaged after local level interaction and dialogue: Indian Army Sources
— ANI (@ANI) May 10, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.