अपघात झाल्यानंतरही वृद्धाला गाडीसोबत 1 कि.मी. फरफटत नेलं

0
166
Old man Accident Bangalore
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगळुरूमध्ये मंगळवारी हादरवून सोडणारी घटना घडली आहे. शहरात स्कूटरवरून आलेल्या एका तरुणाने वृद्ध व्यक्तीच्या गाडीला धडक दिली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीला पकडून राहिलेल्या वृद्धाला त्या व्यक्तीने सुमारे एक किलोमीटर रस्त्यावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बंगळुरूमध्ये मंगळवारी 71 वर्षीय मुथप्पा हे आपल्या बोलेरो गाडीने निघाले होते. यावेळी स्कूटरवरून आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली आणि तिथून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्या वृद्धाने त्याच्या गाडीला पकडले असता त्या तरुणाने आपली दुचाकी तशीच पळवली. तसेच त्याने वृद्ध व्यक्तीला एक किलोमीटर रस्त्यावर फरफटत नेले.

हा प्रकार इतर दुचाकीस्वारांनी पाहिला असता त्यांनी तत्काळ तरुणाचा पाठलागा करत त्याला पकडले. साहिल असे या स्कूटरस्वाराचे नाव असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच पीडित व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.