नैराश्यात तरुण मंडप व्यावसायिकाने संपविले जीवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने नैराश्यात जात ३४ वर्षीय तरुण मांडव व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली. हि घटना शहरातील पाडेगाव भागातील सैनिक कॉलनीत घडली असून भाऊलाल हिरालाल वाणी (३४, रा. माजी सैनिक कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, भाऊलाल हा मंडप डेकोरेशन चा व्यवसाय करत असे, परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. दरम्यान त्यामुळे बँकेचे हफ्ते थकल्याने बँकेचे कर्मचारी घरी पैसे भरण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे भाऊलाल आर्थिक अडचणीत सापडल्याने तो नैराश्यात गेला होता. थोडी अर्थिकी अडचण दूर व्हावी म्हणून तो टोल नाक्यावर काम करू लागला.

रविवारी रात्री कुटुंबातील सर्वजण झोपेत असताना भाऊलाल याने घरात मंडपाच्याच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी त्याच्या बहिणीला हि बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ छावणी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी भाऊलाल याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. के. खाजेकर पुढील तपस करत आहेत.

Leave a Comment