धक्कादायक ! खुल्या मैदानात तरुणीला जिवंत जाळले

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणीला जिवंत जाळण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर हादरलं आहे. विशेष म्हणजे हि मृत तरुणी मागच्या 2 दिवसांपासून बेपत्ता होती. य घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता चौधरी असं मृत तरुणीचे नाव आहे. हि घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी परिसरामध्ये घडली आहे. हि तरुणी 15 मार्चच्या रात्री पासून प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली होती. 15 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निकिता लखन चौधरी मल्टी सर्व्हिसेस ऑफिस पत्ता खामला प्रतापनगर नागपूर येथून ड्युटी करून घरी निघाली होती. मात्र बराच वेळ झाला तरी ती घरी पोहोचली नव्हती. यामुळे निकिताच्या घरचे टेन्शनमध्ये होते.

यानंतर निकिताच्या आईने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार वाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता आज सकाळी निकिताचा मृतदेह आढळून आला. बुधवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनीमध्ये यूओटीसी केंद्राच्य गेटपासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात एका महिलेला पेटवण्यात आले होते. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह निकिताचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपीने निकीताच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.