हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhaar Card Update : आज काल आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आधार शिवाय आता आपल्याला कोणत्याही सरकारी योजनेही लाभ मिळू शकत नाही. तसेच त्याशिवाय आपली ओळख देखील अपूर्ण मानली जाते. पूर्वी आधार कार्ड एका कागदावर छापले जात असे. जे खूप सांभाळून वापरावे लागत असे. तसेच बर्याच वेळा ते गहाळ होण्याची भीतीही असायची. मात्र आता असे होणार नाही, कारण UIDAI आधार कार्ड पॉलिव्हिनाइल क्लोराईड कार्ड (PVC) वर पुन्हा छापण्याची सुविधा देतल आहे. आता हे PVC कार्ड देखील आपल्या एटीएम किंवा डेबिट कार्ड सारखे सहज पणे आपल्या वॉलेट मध्ये ठेवता येईल. तसेच ते लवकर खराब देखील होणार नाही.
PVC कार्ड साठी फी द्यावी लागेल
PVC आधार कार्ड प्रिंट करण्यासाठी आपल्याला 50 रुपये मोजावे लागतील. एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड्स प्रमाणेच PVC कार्ड हे एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे. Aadhaar Card Update
PVC आधार कार्ड कसे बनवावे ???
यासाठी आपल्याला UIDAI च्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर My Aadhaar’ सेक्शनमध्ये जा आणि ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करा. यानंतर, आपल्याला आपला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधारचा आधार एनरोलमेंट आयडी (EID) टाकावा लागेल. यानंतर, आपल्याला सिक्योरिटी कोड किंवा कॅप्चा टाकावा लागेल. त्यानंतर Send OTP चा ऑप्शन एक्टिव्ह होईल. आता आपल्याला इथे क्लिक करावे लागेल आणि यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवर एक OTP मिळेल, जिथून आपल्याला ते OTP वाल्या सेक्शनमध्ये जावे लागेल. यानंतर ऑनलाईन फॉर्म सबमिट करता येईल. Aadhaar Card Update
या संपूर्ण प्रक्रियेनंतर आपल्या समोरच्या स्क्रीनवर PVC आधार कार्डाचे प्रीव्यू असेल तर त्या खाली पेमेंटचा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करून पेमेंट मोडमध्ये जा. ज्याद्वारे तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल. यानंतर, आपल्या आधार PVC कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, UIDAI आधार प्रिंट करेल आणि 5 दिवसात भारतीय पोस्ट डिलिव्हरी करेल. यानंतर, पोस्टल विभाग स्पीड पोस्टच्या माध्यमातून आपल्या घरात पोहोचवेल. Aadhaar Card Update
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
PAN Card ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
EPF account मध्ये आपले बँक डिटेल्स कसे अपडेट करायचे ते समजून घ्या
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा दरमहा 5000 रुपये !!! कसे ते जाणून घ्या
Business Idea : सतत मागणी वाढणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये !!!
Sukanya Samrudhi Yojana मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून जमवा मोठी रक्कम !!!