हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नागरिकांचा खऱ्या अर्थाने आधार बनलेल्या आधार कार्डला फ्री मध्ये अपडेट करण्याची मुदत (Aadhaar Update) केंद्रातील मोदी सरकारने वाढवली आहे. यापूर्वी 14 जून पर्यंत मोफत मध्ये आधारकार्ड अपडेट करून मिळणार असल्याचे सरकारने सांगितलं होते, मात्र आता या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून आता 14 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचे आधारकार्ड अपडेट करू शकणार आहात. त्यामुळे देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
UIDAI कडून आधार कार्ड अपडेट करण्याच्या मुदतीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता 14 सप्टेंबर 2023पर्यंत तुमचा आयडेंटिटी फ्रूफ किंवा अॅड्रेस प्रुफ सादर करुन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फुकट मध्ये आधार अपडेट करु शकता. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तर सीएससी केंद्रावर जाऊन अपडेट करण्यासाठी 25 रुपये शुल्क भरावे लागेल.
अशा पद्धतीने आधार कार्ड अपडेट करा –
1) सर्वात आधी आधारच्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
2) त्यानंतर तुम्हाला “Update Aadhar” विभागात जावे लागेल. यानंतर यूजरला आपला आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाकावा लागेल.
3) त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP च्या मदतीने लॉग इन करता येईल.
4) लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पत्ता, फोन नंबर, नाव किंवा जन्मतारीख यांचे डिटेल्स द्यावे लागतील .
5) मग अपडेट करायच्या डेटासंबधित इतर कागदपत्रांची हार्ड कॉपी अपलोड करावी लागेल.
6) त्यानंतर कन्फर्म आणि सबमिट बटणावर क्लिक करा.अशा प्रकारे तुमचे ऑनलाइन आधार अपडेट होईल.
7) यानंतर, एक युनिक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) येईल, ज्यावरून आधार अपडेट्सबाबत माहिती मिळेल.