हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड (Aadhar Card) हे एक अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे. त्याशिवाय आता कोणतेही काम करणे अवघड आहे. अनेक सरकारी योजनांमध्ये आधार कार्ड गरजेचे झाले आहे. आधार बनवताना आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो, मात्र अनेक वेळा लोकं आधार कार्ड बनल्यानंतर नंबर बदलतात. तसेच आधारमध्ये नवीन नंबर रजिस्टर्ड नसल्यामुळे त्यांना नोटिफिकेशन मिळणे बंद होते. ज्यामुळे बरीच कामं अडकून राहतात.
आता आपल्याला घरबसल्या आधार कार्ड (Aadhar Card) मध्ये फोन नंबर अपडेट करता येईल. यासाठी UIDAI चे पोर्टल http://Ask.uidai.gov.in वर जावे लागेल. वास्तविक, अनेक वेळा असे घडते की लोकांचे मोबाईल हरवतात किंवा काही कारणास्तव नंबर बंद होतात. जर आपला जुना मोबाईल नंबर बंद झाला असेल तर आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आधार आपल्याला आधार एनरोलमेंट सेंटरला जावे लागेल. चला तर मग आधार मध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करावा हे जाणून घेऊयात…
त्यासाठी आपल्याला जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये जावे लागेल.
आधार अपडेट/करेक्शन फॉर्म भरा
आता आधार एक्सिक्युटीव्हकडे फॉर्म सबमिट करा
त्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल
यानंतर एक पावती दिली जाईल, ज्यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. अपडेट रिक्वेस्टचे स्टेट्स तपासण्यासाठी याचा वापर करता येईल.
यानंतर 90 दिवसांच्या आत आधारच्या (Aadhar Card) डेटाबेसमध्ये मोबाईल नंबर अपडेट केला जाईल.
हे ही वाचा : aadhar card : बनावट आधार नंबर ओळखण्यासाठीची संपूर्ण पद्धत जाणून घ्या
हे ही वाचा : तुमच्या आधारचा कुठे गैरवापर होत आहे का? Aadhar Authentication History कशी तपासावी जाणून घ्या